उल्लास मोबाईलॲप प्रशिक्षण
उल्लास – मोबाईल ॲप Ullas Mobile App मध्ये काही बदल करण्यात आलेले असल्याने सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रशासनामार्फत दि. ०७/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार आपण प्रशिक्षणास स्वतः उपस्थित रहावे व जिल्हयातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या इ. १ ली ते १२ वी शाळांचे प्राचार्य/मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच प्रशिक्षणा दरम्यान आपल्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास चॅट बॉक्स मध्ये नोंदवाव्यात. प्रशिक्षणाच्या शेवटी त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल अशा सूचना आपल्या स्तरावरुन निर्गमित कराव्यात.
सदर प्रशिक्षणास राज्य स्तरावरील राज्य साक्षरता प्राधिकरण व राज्य साक्षरता केंद्र येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व संबंधितांनी पूर्ण वेळ प्रशिक्षणास उपस्थित रहावे.
तारीख व वेळ 📆🕙:- दि.०७/०८/२०२४ रोजी स.१०.०० वा