Regarding NEET (UG)-2024: Posts circulating on Social Media
NEETEXAM2024 | #NEETUG प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी निराधार एनटीए ने एनईईटी-यूजी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET-UG 2024 प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणारे अहवाल निराधार असल्याचे म्हटले आहे. एनटीएने एका निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही पेपर लीककडे लक्ष वेधणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट पूर्णपणे निराधार आणि कोणतेही कारण नसलेल्या आहेत. त्यात म्हटले आहे की NEET (UG) 2024 काल 571 शहरांमधील चार हजार 750 केंद्रांवर यशस्वीरित्या पार पडली.
एनटीएने सांगितले की, राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या एका केंद्रावर एक घटना घडली आहे जिथे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा संपण्यापूर्वी जबरदस्तीने प्रश्नपत्रिका काढून घेतली. या प्रश्नपत्रिकेचे चित्र पेपरफुटीच्या कथित घटनेशी जोडले जाणे हे खोडसाळ आणि निंदनीय असल्याचे त्यात म्हटले आहे. NTA ने स्पष्ट केले की सोशल मीडियावर फिरत असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या इतर सर्व छायाचित्रांचा वास्तविक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी कोणताही संबंध नाही.
NEET UG 2024 मध्ये यावर्षी विक्रमी नोंदणी झाली असून 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. एनटीएने उमेदवार, पालक आणि शिक्षकांना आगामी परीक्षांमध्ये अशा अफवांकडे लक्ष देऊ नये, असा सल्ला दिला आहे.

