सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज
सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०, वसतिगृह अधीक्षक-१७, कवायत प्रशिक्षक-०१, शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१, तर गट “क” या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका, गट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी ०१ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे.
ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्या मार्फत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे ३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होणार असल्याचे सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Application for Posts in Sainik Welfare Office
The following direct service posts are to be filled in the Soldier Welfare Department and the District Soldier Welfare Office under the Department. Welfare Coordinator-40, Hostel Superintendent-17, Drill Instructor-01, Director of Physical Training-01, whereas for the post of Group “C” only ex-serviceman candidates and for the post of Hostel Superintendent, Group-C-03 the wives of deceased soldiers of Indian Armed Forces and If wives of deceased servicemen are not available, applications are being invited online from candidates who fulfill the conditions of service entry rules. Out of these posts, 01 post will be filled from the candidates with at least 40% disability from the disabled cadre considering the duties and responsibilities according to the type of disability.
This recruitment process will be done through TCS-ION. Applications for the examination will be accepted through online mode only. Applications in any other mode will not be entertained. Eligible candidates will be required to submit the web-based online application on the website www.mahasainik.maharashtra.gov.in under the Recruitment Tab on or before 3rd March 2024 by 6 PM. The Assistant District Soldier Welfare Officer, Mumbai City has informed through a press release that the said web link will be closed after that.