संदेस (Sandes) ॲप: शासकीय संप्रेषणासाठी स्वदेशी आणि सुरक्षित समाधान
संदेस (Sandes) ॲपचे महत्व
केंद्र शासन आणि राज्य शासन, शासकीय कार्यालये व स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेश आणि संप्रेषणांची देवाणघेवाण होते. हे संदेश प्रामुख्याने मजकूर स्वरूपात असले तरी, ऑडिओ/व्हिडिओ क्लिप आणि नस्ती इत्यादींमधील माहितीचीदेखील सुरक्षितपणे देवाणघेवाण होत असते. संदेश ॲप हे डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम असून शासन ते शासन (Govt. to Govt.) आणि शासन ते नागरिक (Govt. to Citizen) संप्रेषण/संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्रोत आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे. संदेश ही सुरक्षितपणे शासकीय पायाभूत सुविधांवर आधारित प्रणाली आहे. तिचे धोरणात्मक नियंत्रण शासनाकडे आहे.
संदेस ॲपची वैशिष्ट्ये
संदेस ॲप Sandesh App हे गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर कोणालाही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व सुविधा प्रदान करते. याव्यतिरिक्त, संदेस ॲपची शासकीय वापरासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- सुरक्षित संप्रेषण: संदेश सुरक्षितपणे पाठवणे व प्राप्त करणे, सुरक्षित साठवण, ओटीपी पाठवणे व वितरित न झालेला डेटा सुरक्षित ठेवणे.
- अनुकूलन: शासन/शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित (Customization) करण्याची सुविधा.
- एन्क्रिप्टेड सेवा: एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी eGov ॲप्लिकेशन्ससह सेवा आधारित एकीकरण.
- गट निर्मिती: अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधा.
- सुरक्षित ओटीपी आणि अलर्ट: SMS च्या ऐवजी ओटीपी, ॲलर्ट, सूचना व प्रसारण करणारी सुरक्षित व विनाशुल्क प्रणाली.
- सत्यापित वापरकर्ते: सत्यापित आणि सार्वजनिक वापरकर्त्यांमधील पृथक्करण.
- पडताळणीचा पर्याय: संदेस पोर्टलद्वारे शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय.
- प्रोफाइल लपविण्याची सुविधा: संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलांची दृश्यमानता लपविण्याची सुविधा.
- शासकीय इमोजी आणि टॅग्स: शासनासाठी योग्य जिमोजी (शासकीय इमोजी) आणि टॅगसह डिझाइन केलेले संवाद.
- वेब आवृत्ती: डेस्कटॉप/लॅपटॉपसाठी संदेस वेब आवृत्तीची उपलब्धता. (sandes.gov.in)
- संदेश प्रसारण: संदेस पोर्टलवरून संस्थेतील विशिष्ट वापरकर्त्यांसाठी संदेश प्रसारणाची सुविधा.
- भूमिका आधारित व्यवस्थापन: पोर्टलवरून भूमिका आधारित व्यवस्थापन आणि देखरेख.
- सहाय्यक सेवा: eGov ॲप्लिकेशन्समधून मेसेज आणि फाइल्स पाठवण्यास साहाय्य करते.
- पावती सुविधा: ॲप्लिकेशन्समधून पाठवलेले संदेश आणि ते वाचल्याची पावती प्राप्त झाल्याची सुविधा प्रदान करते.
- ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स: एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स (एकाबरोबर एक आणि सामाईक).
- गट व्यवस्थापन: एकात्मिक बाह्य अनुप्रयोगाद्वारे गट व्यवस्थापनाची सुविधा प्रदान करते.
संदेस ॲप वापरण्याच्या सूचना
NIC द्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेस (Sandes App) ॲपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच विविध राज्य शासनांमधील २०० हून अधिक शासकीय संस्था यांच्याकडून तसेच ३५० हून अधिक ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्समध्ये संदेश, सूचना व ओटीपी पाठविण्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्र राज्य शासनामार्फत शासकीय कामकाजात संदेस ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधीनस्थ शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत.
यासाठी शासकीय विभागांनी/कार्यालयांनी करावयाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत:
- ऑनबोर्डिंग फॉर्म: sandes.gov.in/download या संकेतस्थळावर जाऊन organisation onboarding फॉर्म डाऊनलोड करून त्यावरील माहिती व्यवस्थित भरावी.
- दस्तावेज पाठवणे: सदर फॉर्मची Document copy आणि Scanned copy, hod.sandes_mhsc@nic.in या ई-मेलवर सक्षम प्राधिकरणांच्या शासकीय ई-मेलवरून पाठविण्यात यावी.
- त्वरित अंमलबजावणी: सदर सूचना या आदेशाच्या दिनांकापासून त्वरित अमलात येतील.
संदेस ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Sandes app download apk,Sandes app download for pc,Sandes app download,Sandes app login,Download,sandes app latest version,How to register sandes app,How to get otp from sandes app,How to use Sandes app,Sandes app portal click here