पीएम इंटर्नशिप योजना : देशातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना
केंद्र सरकारने तरुणांना रोजगारसिद्ध करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना तेल व वायू, बँकिंग, वित्तीय सेवा, पर्यटन, ऑटोमोबाईल, उत्पादन, FMCG यासारख्या 24 प्रमुख उद्योगांमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
योजनेचे उद्दिष्ट आणि लाभ
- उद्दीष्ट: तरुणांना उद्योग क्षेत्रातील अनुभव देऊन रोजगारासाठी सक्षम करणे.
- आर्थिक सहाय्य: प्रतिमहिना ₹5000 स्टायपेंड (₹4500 सरकार + ₹500 कंपनी)
- अनुदान: इंटर्नशिप सुरू करण्यासाठी ₹6000 एकरकमी अनुदान
- विमा कव्हर: प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
पात्रता आणि अटी
- वय: 21 ते 24 वर्षे
- शिक्षण: 12वी पास, ITI, डिप्लोमा, पदवीधर (BA, B.Sc, B.Com, BBA, BCA, B.Pharma इ.)
- वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी असावे
अपात्रता
- IIT, IIM, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, IISER, NID, IIIT मधील विद्यार्थी
- CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA किंवा मास्टर्स पदवीधारक
- आधीपासून सरकारी इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप करणारे विद्यार्थी
- पालक शासकीय नोकरीत असलेले विद्यार्थी
अर्ज प्रक्रिया
- PM इंटर्नशिप पोर्टलवर (pminternship.mca.gov.in) जाऊन रजिस्ट्रेशन करा.
- व्यक्तिगत आणि शैक्षणिक माहिती भरावी.
- आपली पात्रता आणि आवड यानुसार 5 इंटर्नशिपसाठी अर्ज करा.
देशभरातील संधी
- 730 जिल्यांमध्ये उपलब्धता – तरुणांना त्यांच्या जिल्ह्यातच संधी.
- 500+ कंपन्या सहभागी – सर्व प्रमुख उद्योग समाविष्ट.
- SC, ST, OBC आणि दिव्यांगांसाठी प्राधान्य – सर्वांना समान संधी.
योजनेंची यशस्वीता आणि भविष्यातील संधी
(PM Internship Scheme) योजना 3 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली असून, आतापर्यंत 1.27 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध केल्या आहेत. यात 6.21 लाख अर्ज आले असून 4.87 लाख युवकांनी KYC पूर्ण केली आहे. सरकारने दुसऱ्या टप्प्यात 1 लाख नवीन संधी जाहीर केल्या आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेत कोण अर्ज करू शकतो?
12वी पास, ITI, डिप्लोमा किंवा पदवीधारक विद्यार्थी, ज्यांचे कुटुंब उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी आहे.
2. योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही?
IIT, IIM, CA, CMA, CS, MBA, MBBS यांचे विद्यार्थी आणि सरकारी कर्मचारी पालक असलेले विद्यार्थी अपात्र आहेत.
3. अर्ज कुठे करावा?
pminternship.mca.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
4. इंटर्नशिपसाठी किती स्टायपेंड मिळेल?
₹5000 प्रति महिना (₹4500 सरकार + ₹500 कंपनी) आणि ₹6000 प्रारंभिक अनुदान.
5. कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप उपलब्ध आहे?
तेल आणि वायू, बँकिंग, ऑटोमोबाईल, वित्तीय सेवा, उत्पादन, FMCG, हॉस्पिटॅलिटी यासह 24 उद्योग.
6. अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?
31 मार्च 2025 ही अंतिम तारीख आहे.