• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Next Academy
ADVERTISEMENT
  • Home
  • Education News
    • Exam
    • School
    • Study Abroad Shiksha
  • Board exam
    • CBSE Board
  • Yojana
  • News Update
No Result
View All Result
  • Home
  • Education News
    • Exam
    • School
    • Study Abroad Shiksha
  • Board exam
    • CBSE Board
  • Yojana
  • News Update
No Result
View All Result
Next Academy
No Result
View All Result
Home News Update

15 जून पासून असा असेल शाळेचा गणवेश; एक राज्य एक गणवेश योजना

From June 15, the school uniform will be; One State One Uniform Scheme

nextupdates.in by nextupdates.in
11 June 2024
in News Update
0

इ. १ ली ते इ. ४ वी मुली ,इ.५वी मुली

49
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

15 जून पासून असा असेल शाळेचा गणवेश; एक राज्य एक गणवेश योजना

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत दि.०८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील देण्याबाबतचा शासन निर्णय दि.०६ जुलै, २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय दि.१८ ऑक्टोबर, २०२३ अन्वये देण्यात आल्या आहे. प्रस्तुत शासन निर्णयातील गणवेशाच्या रचनेच्या अनुषंगाने दि. २४ जानेवारी, २०२४ रोजी शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. स्काऊट व गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना भारत स्काऊट व गाईड, नवी दिल्ली या संस्थेने निश्चित केल्याप्रमाणे करण्याची विनंती शासनास केली होती. त्यास मान्यता मिळाल्यानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी कापड खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे.

ADVERTISEMENT

एक राज्य ….एक गणवेश योजना | One State ….One Uniform Scheme

RelatedPosts

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

BA/B.Sc B.Ed (एकात्मिक) अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2025-26 रद्द – नवीन ITEP अभ्यासक्रम सुरू

राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच, स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेशाची रचना खालीलप्रमाणे राहिल.

ADVERTISEMENT

इयत्ता नियमित गणवेश स्काऊट व गाईड
इ. १ ली ते इ. ४ वी मुली आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळया रंगाचा पिनो फ्रॉक (one Piece) गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक
इ.५वी मुली आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट
www.nextupdates.in
अ) इ.६ वी ते इ.८वी मुली ब) इ.१ ली ते इ.८ वी मुली (ऊर्दू माध्यम) आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळा गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी
इ. १ ली ते इ.७ वी मुले आकाशी रंगाचा शर्ट गडद निळ्या रंगाची हाफ पँट स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट
इ.८ वी मुले आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट

मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित व स्काऊट- गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णय दि. ८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील. तसेच, स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा. स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी (मंगळवार, गुरुवार, शनिवार) स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात याव्यात.

मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील शाळा दि. १५ जून, २०२४ पासून सुरू होत आहेत. महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या (स्काऊट-गाईड) गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावे. सदर स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी रु.१०० प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च रु.१० असे एका गणवेशासाठी एकूण रु. ११० प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वर्ग करावी. सदर निधीतून विद्यार्थ्यांना दुसरा (स्काऊट-गाईड) गणवेश स्थानिक स्तरावर शिलाई करुन शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करुन द्यावा.

Tags: एक राज्य एक गणवेश योजनामोफत गणवेश योजनास्काऊट व गाईड गणवेश
Previous Post

कोण होणार भारताचा पंतप्रधान ?

Next Post

Registration

nextupdates.in

nextupdates.in

Next Post

Registration

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

5 May 2024

राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय

5 March 2025

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील नेट सेट पात्रता धारक शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात महत्त्वाचा निर्णय

5 March 2025

भारतातील पहिली AI teacher केरळच्या शाळेत ; अशी आहे AI शिक्षिका

7 March 2024

अभियांत्रिकी (Engineering Admission Process) प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

7

महात्मा गांधी मराठी माहिती | २ ऑक्टोबर 

1

इस्रोने (ISRO) युवा वैज्ञानिक कार्यक्रम 2024 (YUVIKA) जाहीर

1

भारतातील पहिली AI teacher केरळच्या शाळेत ; अशी आहे AI शिक्षिका

1
CBSE Class 12 Results Declared: 88.39% Pass; Girls Outshine Boys By Nearly 6%

CBSE १२वी निकाल जाहीर | CBSE Class 12 Results Declared

13 May 2025
PM-YUVA 3.0

पीएम-युवा 3.0 : युवा लेखकांना घडविण्यासाठी पायाभूत योजना

13 March 2025
PM Internship Scheme

पीएम इंटर्नशिप योजना : देशातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

13 March 2025

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

12 March 2025

Recent News

CBSE Class 12 Results Declared: 88.39% Pass; Girls Outshine Boys By Nearly 6%

CBSE १२वी निकाल जाहीर | CBSE Class 12 Results Declared

13 May 2025
PM-YUVA 3.0

पीएम-युवा 3.0 : युवा लेखकांना घडविण्यासाठी पायाभूत योजना

13 March 2025
PM Internship Scheme

पीएम इंटर्नशिप योजना : देशातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

13 March 2025

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

12 March 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: 9168667007

© 2025 Next Update - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Next Update.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • News Update
  • Education News
    • School
    • Exam
    • Study Abroad Shiksha
  • Yojana
  • Board exam
    • CBSE Board
  • Courses after 12th

© 2025 Next Update - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Next Update.