शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या इयत्ता ५ ते १० मध्ये शिकणाऱ्या पाल्यांसाठी मोफत एक दिवसीय विज्ञान कार्यशाळा.
One-Day Science Workshop; एलजी ग्रीन सायन्स लॅब व भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या इयत्ता ५ ते १० मध्ये शिकणाऱ्या पाल्यांसाठी मोफत ” एक दिवसीय सायन्स वर्कशॉप ” दिनांक – २७ मे २०२४ रोजी ठीक स. – ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत सर सी.व्हि. रमण सभागृह, भौतिकशास्त्र विभाग या ठिकाणी भरवण्यात येणार आहे.
स्थळ – सर सी.व्हि. रमण सभागृह, भौतिकशास्त्र विभाग
कार्यशाळेची वैशिष्टे
- फन विथ नायट्रोजन – लिक्विड नायट्रोजनचे विविध प्रयोगाचे सादरीकरण.
- विज्ञान एकांकिका सादरीकरण.
- विविध प्रयोगशाळांची सफर.
- विविध प्रयोगांची विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रात्यक्षिके
- सहभागी विद्यार्थ्यांना मोफत सायन्स किट व पुस्तकाचे वाटप करण्यात येईल.
- सहभाग प्रत्येकास अल्पोपहार व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
कोण सहभागी होव शकतो ?
विद्यापीठात कार्यरत असणारे (कायम व विद्यापीठ निधीतील) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे इ. ५ ते १० मध्ये शिकणारे पाल्य.
सहभागी कसे व्हायचे?
खाली दिलेल्या लिंक वरील गूगल फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
किंवा 9503269293 या Whats App नंबरवर आपली माहिती पाठवावी प्रवेश मर्यादित . आजच आपला प्रवेश निश्चित करा.