एमएचटी-सीईटी २०२४ च्या परीक्षेत अनुग्रह गुणाबाबत सूचना
Notice regarding grace marks in MHT-CET 2023 exam
महत्वाची सूचना: एमएचटी-सीईटी २०२४ च्या परीक्षेत कोणत्याही उमेदवारास अनुग्रह गुण देण्यात आलेले नाहीत. याबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून वस्तुस्थितीदर्शक दिलेला खुलासा…
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी २०२४ (MHT-CET 2024 ) ही सामाईक प्रवेश परीक्षा २२ एप्रिल, २०२४ ते ३० एप्रिल, २०२४ (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक ०२ मे, २०२४ ते १६ मे, २०२४ (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण १६९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पीसीबी ग्रुपची परीक्षा १२ सत्रांमध्ये व पीसीएम ग्रुपची परीक्षा १८ सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. या परीक्षेस एकूण ३ लाख ३० हजार ९८८ विद्यार्थी, ३ लाख ९४ हजार ३३ विद्यार्थीनी व ३१ तृतीयपंथी उमेदवार होते. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यापैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
उमेदवाराचे एखाद्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पध्दत नाही. हा निकाल पसेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलेला आहे. या परीक्षेच्या निकालामध्ये कोणत्याही उमेदवाराला अनुग्रह गुण (Grace Marks) देण्यात आलेले नाहीत.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ अर्ज ऑनलाईन
या परीक्षेअंतर्गत प्रश्न अथवा उत्तर याबाबतीत पालक / परीक्षार्थी यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर सीईटी कक्षामार्फत ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय निकाल पसेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.
समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पसेंटाईल दाखविलेले आहेत. हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. एकाच सत्रात समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना समान पसेंटाईल मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे ही परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पसेंटाईल मिळालेले आहेत.
तसेच उमेदवारांना उपलब्ध केलेल्या उत्तरतालिकेप्रमाणे त्यांनी काढलेले गुण त्यांना मिळालेले नाहीत, हे सुद्धा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही या कार्यालयामार्फत उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय निकाल पसेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.
ही परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेवून त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. परंतू, प्रत्येक बॅचला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते, असा आक्षेप आहे. तथापि, प्रत्येक सत्राचा निकाल स्वतंत्रपणे तयार करण्यात येतो. ही कार्यपध्दती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आहे एप्रिल २०२४ च्या परीक्षेआधी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामुळे हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. तसेच आतापर्यंत सीईटी सेल, मुंबई कार्यालयामध्ये निवेदन घेवून आलेल्या जवळपास २०० पालकांचे / उमेदवार तसेच ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या निवदेनांची शहानिशा करून प्रत्येक तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे.
यामध्ये सर्व सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी बॅचप्रमाणे पर्सेटाईल पध्दतीने निकाल जाहीर करण्यात येतो ही परीक्षा पद्धत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे.