वैद्यकीय समुपदेशन समितीने 2024 च्या NEET UG आणि PG समुपदेशनाचे वेळापत्रक अद्याप अधिसूचित केलेले नाही
आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) अंतर्गत वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) 2024 वर्षासाठी NEET UG आणि PG अभ्यासक्रमांचे समुपदेशन वेळापत्रक अद्याप अधिसूचित केलेले नाही.
NEET UG आणि PG साठी समुपदेशन वेळापत्रक MCC ने त्यांच्या वेबसाइटवर परीक्षा प्रक्रिया पूर्ण केल्यावर आणि नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) द्वारे सीट मॅट्रिक्स अंतिम करण्याच्या आधारावर जाहीर केले आहे. 2021, 2022 आणि 2023 मध्ये, UG जागांसाठी समुपदेशन अनुक्रमे 19/1/2022, 11/10/2022 आणि 20/7/2023 रोजी सुरू झाले.
2024 साठी NMC ने जूनच्या शेवटच्या आठवड्यात UG आणि PG जागांसाठी सीट मॅट्रिक्सचे अंतिम रूप देण्याचे वेळापत्रक संप्रेषित केले आहे जे दर्शविते की ते जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात UG सीट मॅट्रिक्स आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत PG सीट मॅट्रिक्स अंतिम करेल. MCC त्यानुसार समुपदेशन वेळापत्रक सूचित करेल.
त्यामुळे, MCC ने अद्याप 2024 च्या समुपदेशनाचे वेळापत्रक अधिसूचित केलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.
