मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे नवीन पत्ता – चर्नी रोड, मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये स्थलांतर
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे स्थलांतर नुकतेच चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावर करण्यात आले आहे. यामुळे आता या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना नवीन पत्ता वापरणे आवश्यक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई, मित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशनजवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह, मुंबई – 400002 या पत्त्यावर पत्रव्यवहार करावा, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
या बदलाबद्दल सर्व अधिनस्त कार्यालये, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (माध्यमिक) जिल्हा परिषद / महानगरपालिका, प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालये, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.