मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना | MAJHI LADKI BAHAN YOJANA
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे उदिदष्टः
१. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
२. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
३. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
४. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
५. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना योजनेचे स्वरुपः
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु.१५००/- इतकी रक्कम दिली जाईल.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची पद्धत :
योजेनचे अर्ज नारीशक्ती दूत मोबाइल अॅपद्वारे / वेब पोर्टलद्वारे ऑनलाइन भरता येतील.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची प्रक्रिया :
१. पात्र महिलेस नारीशक्ती दूत (NARISHAKTI DOOT) अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज स्वतः भरता येईल. त्याकरिता गूगल प्लेस्टोर वरून नारीशक्ती दूत हे अॅप डाऊनलोड करावे. सदर सुविधा केवळ ANDROID मोबाइल वर उपलब्ध आहे.
२. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र / ग्रामसेवक / समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका / वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
३. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना (majhi ladki bahan yojana) आवश्यक कागदपत्रे :
१. आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)
२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड /१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
४. वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक,
- (अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)
७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो