मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना: पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अपात्रता
महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष व अटी जाहीर करण्यात आले आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी मोबाईलवर असा भरा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता:
- रहिवास: लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- वयोमर्यादा: २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- बँक खाते: अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
- उत्पन्न: लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र: जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
- उत्पन्नाचा दाखला: सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळेल.
- बँक खाते पासबुक: पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही.
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- हमीपत्र: योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबत लाभार्थ्याचे स्वाक्षरीसह हमीपत्र आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अपात्रता:
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या नियमित/कायम कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन घेणारे सदस्य.
- बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
- शासनाच्या इतर विभागामार्फत दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतलेल्या महिला.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, मंडळ, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्ज करावा. योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाला चालना मिळेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.